Buldhana Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: अज्ञात वाहनाची कारला धडक, डॉक्टर मुलासह आईचा जागीच मृत्यू

Buldhana Accident News: नववधूच्या घरी होळीचा सण साजरा करून परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय जाधव, बुलढाणा

Buldhana Accident News:

नववधूच्या घरी होळीचा सण साजरा करून परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली. ज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना खामगाव बाळापुर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ 31 मार्च रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान घडली आहे.

मिळाल्या माहितीनुसार, बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंत शैल्य चिकित्सक डॉ. निलेश रामराव माळोदे (२७) याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता. सदर नववधूला होळीचा सण साजरा करण्यासाठी रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. निलेश रामराव माळोदे व संगीता रामराव माळोदे हे तिघे कार इंदोर येथे गेले होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातच कार्यक्रम आटपून आज संध्याकाळी परत बाळापूर येथे येत असताना गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्या कारवर काळाने घाला घातला. अकोला येथील खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चार वेळा पालटली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. (Latest Marathi News)

या अपघातात डॉ. निलेश माळोदे व त्याची आई संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील रामराव माळोदे हे गंभीर स्वरूपाने जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारात दाखल केले आहे.

वृत्त येईपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. दरम्यान, डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या २० एप्रिल रोजी विवाह पार पडणार होता. त्यांच्या विवाहाची जवळपास सर्व तयारी झालेली होती. नातलगांना निमंत्रण सुद्धा पाठविण्यात आले होते. मात्र लग्नाआधीच त्यांचा अपघातात निधन झाल्याने माळोदे कुटुंबावर दुःखाचं मोठं डोंगर कोसळलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT