University, maharashtra, strike saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : सर्व बोर्ड, विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार; शिक्षकेतर कर्मचा-यांनी उपसले संपाचे हत्यार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना १३ जानेवारीच्या पत्राने संपाची नाेटीस दिली.

विश्वभूषण लिमये

Maharashtra Universities : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्रित संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. येत्या २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. तसेच २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर (strike) जाणार असल्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. (Maharashtra News)

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी आम्ही आंदाेलन छेडणार आहाेत असे दत्ता भोसले (जिल्हाध्यक्ष, कॉलेज कर्मचारी युनियन, साेलापूर (solapur) यांनी नमूद केले. येत्या दाेन फेब्रुवारीला आमच्या आंदाेलनाचा पहिला टप्पा असल्याचे भाेसलेंनी नमूद केले.

या आंदाेलनाचा दूसरा टप्पा २० फेब्रुवारीपासून असेल. राज्यातील सर्व विद्यापीठ (universities) स्तरावरील कर्मचारी बेमुदत संपावर जातील. या कालावधीत हाेणा-या नुकसानाची जबाबदारी सरकारने घ्यावा असे सोमनाथ सोनकांबळे (महासंघचे प्रतिनिधी) यांनी स्पष्ट केले.

या मागण्यांसाठी आंदाेलन छेडणार

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करा.

सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करा.

सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतत्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा.

विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला, त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी.

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.

२००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT