Unique Marriage Invitation Card SAAM TV
महाराष्ट्र

Unique Wedding Invitation: नातेवाईकांच्या रुसव्याफुगव्यांवर नवरदेवाने काढला तोडगा! लग्नपत्रिका छापताना लढवली भन्नाट शक्कल

Viral Lagna Patrika : लग्नपत्रिकेतील नावावरून अनेकदा नातेवाईकांमध्ये रुसवे फुगवेही होतात. अहमदनगर येथील एका नवरदेवाने भन्नाट तोडगा काढला आहे.

Chandrakant Jagtap

>> सुशील थोरात, साम टीव्ही

Unique Marriage Invitation Card : लग्नपत्रिका म्हटलं की त्यात कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या नावांची गर्दी असते. यावरून अनेकदा रुसवे फुगवेही होतात. मग त्यांना मान देऊन त्यांची मनधरणी देखील करावी लागते. यामुळे वधू आणि वराकडच्या मंडळींची फार ओढाताण होते. मात्र या सर्व अडचणींवर अहमदनगर येथील एका नवरदेवाने भन्नाट तोडगा काढला आहे. या नवरदेवाने लग्नपत्रिकेत नातेवाईकांच्या नावांऐवजी थेट शासकीय योजनांची माहिती छापली आहे. या लग्नपत्रिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

अहमदनगरच्या जाधव आणि तांबे यांच्या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये नातेवाईकांच्या नावाऐवजी शासकीय योजनांची माहिती छापून दोन्ही कुटुंबांनी एक वेगळा संदेश समाजाला दिला आहे. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या पुतण्याचे हा लग्नसोहळा आहे. त्यासाठी छापण्यात आलेल्या लग्न पत्रिकेमध्ये नातेवाईकांची नाव छापण्याऐवजी त्यांनी सरकारी योजनांची माहिती छापली आहे.

ही लग्नपत्रिका छापण्यामागे उद्देश काय?

याविषयी बोलताना धनंजय जाधव यांनी सांगितले की, लग्नपत्रिकेत नातेवाईंकांच्या नावावरून अनेकदा रुसवे -फुगवे होतात. त्यामुळे ते टाळून लग्न पत्रिकेत लोकांच्या हिताची माहिती छापण्याचा निर्णय घेतला आणि सरकारी योजनांची माहिती छापून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.

पत्रिकेमध्ये कोणत्या योजनांची माहिती?

या पत्रिकेमध्ये पाच वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती, निकष आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आयुष्यमान भारत योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसह विविध योजनांची माहिती आहे. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती, संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. अशा जवळपास 20, 000 लग्नपत्रिका छापण्यात आल्याची माहिती धनंजय जाधव यांनी दिली आहे. (Breaking News)

नातेवाईकांकडून उपक्रमाचं स्वागत

सध्या लग्नपत्रिका वाटण्याचं काम जाधव कुटुंबिय आणि तांबे कुटुंबियांतर्फे चालू असून ही पत्रिका पाहून अनेक नागरिक आणि नातेवाईक या उपक्रमाचे स्वागत करत आहेत. कारण अनेक योजनांची माहिती या पत्रिकेत आसल्यामुळे ही पत्रिका कायमस्वरूपी प्रत्येकाच्या घरामध्ये राहणार आहे. यामध्ये रुग्णवाहिकेचे आणि विविध योजना राबवणाऱ्या दवाखान्याचे नाव आणि नंबर देण्यात असल्याने ही पत्रिका कायमस्वरूपी प्रत्येकाच्या घरात राहणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT