Ramdas athawale  saam tv
महाराष्ट्र

मनसेला शिंदे सरकारकडून १ मंत्रीपद मिळणार ? रामदास आठवले म्हणाले...

मनसेला (MNS) देखील एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे

प्रदीप भणगे

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील पत्रकार परिषदेत आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सूत्रांकडून नवीन मंत्र्यांच्या शपथविधीची संभाव्य तारिख समोर आली. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपला किती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, मनसेला (MNS) देखील एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ramdas Athawale News)

रामदास आठवले हे कल्याणात एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मनसेला देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे, असे विचारले. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, 'मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच नाही. मनसे हा निवडणुकीत आमच्यासोबत नसल्याने त्यांना मंत्रीपद देण्याचा प्रश्नच येत नाही. जर तसा विचार होत असेल, तर त्याचा विरोध करू'.

आरपीआयचा मंत्रिमंडळात सहभाग असणार - रामदास आठवले

राज्यात काही दिवसांपूर्वीच शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता काही दिवसातच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देखील १ मंत्री पद मिळेल, अशी आशा केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT