nitin gadkari  Saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Nitin Gadkari Latest news : काही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते, अशी चिंता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी हे नागपुरात बोलत होते.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : जागतिक स्तरावर सध्याची परिस्थिती पाहता इराण-इस्त्रायल युद्ध असो की रशिया-युक्रेन युद्ध असो. त्यामुळे कधीही जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची चिंता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपुरात डिफेन्स संदर्भात लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे

संपूर्ण विश्वात संघर्षाचे वातावरण आहे. इराण इस्त्रायलमधील सुरू असलेले युद्ध युक्रेन-रशियाचा दरम्यान सुरू असलेले युद्ध या दोन्ही युद्धाच्या पार्श्वभूमीवर कधीही जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर डिफेन्स स्तरावर मापदंड बदललेले आहे. रणगाडी आणि विमान याचा रिलिव्हन्स राहिलेला नसून मिसाईल आणि ड्रोन याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.

या नवीन विकसित तंत्रज्ञानामुळे युद्धाचे आयाम सुद्धा बदलले आहे. या सगळ्या परिस्थिती मानवतेचा रक्षण करणे कठीण आहे. मिसाईल हे नागरी वस्तीवर सुद्धा पडतात. जगासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. या सगळ्या प्रश्नांवर जागतिक स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे हे मार्गक्रम विनाशाकडे सुरू आहे.

सुपर पॉवरमध्ये अधिकारवादी आणि हुकूमशाही वृत्ती आहे. त्यामुळे समन्वय संवर्धन आणि प्रेम संपत चालले आहे.

संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भूमी असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनांचा मागोवा घेऊन चिंतन करून भविष्यातला धोरण निश्चित करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT