Union Minister Narayan Rane praised Chitra Wagh  Saam TV News
महाराष्ट्र

Narayan Rane : वा! चित्राताई वाघ वा! आज बाळासाहेब ठाकरे असते तर...नारायण राणे ट्विटमध्ये काय म्हणाले

Narayan Rane on Chitra Wagh : दिशा सालियन प्रकरणावरुन विधानसभेसह विधान परिषदेतही मोठा गदारोळ झाला. या प्रकरणावरुन चित्रा वाघ आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांचं कौतुक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.

Prashant Patil

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेसह विधान परिषदेतही मोठा गदारोळ झाला. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांचे कौतुक केलं आहे.

नारायण राणेंचं ट्विट

वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या १५ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई! असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांच्या ट्वीटवर चित्रा वाघ यांनीही कमेंट केली आहे. धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना जरुरी है. जो जिन्दा हों तो फिर जिन्दा नजर आना जरूरी है. मी सत्यासाठी… न्यायासाठी… अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते… पुनःश्च धन्यवाद नारायण राणे साहेब, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT