मामाच्या पोरीला पटवणे पडले महागात ! विजय पाटील
महाराष्ट्र

मामाच्या पोरीला पटवणे पडले महागात !

सांगलीच्या जत तालुक्यातील खिलारवाडी येथील तरुणाचा मामाच्या मुलीच्या वादातून खून झाल्याचे उघड झाले आहे.

विजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या Sangali जत Jat तालुक्यातील खिलारवाडी येथील तरुणाचा मामाच्या मुलीच्या वादातून खून Murder झाल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकातील Karnataka विजापूर Bijapur जिल्ह्यात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. नाना लोखंडे यांच्या मामानेच हा खून केल्याचे उघड झाले असून जत पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

नाना लोखंडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खिलारवाडी येथील नाना लोखंडे हा सेंट्रीगचे काम करत होता. तसेच त्याचा पानपट्टी व्यवसाय होता. हा तरुण २२ जून रोजी तो घरातून बेपत्ता झाला होता. जत पोलीस ठाण्यात नाना लोखंडे हा बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

हे देखील पहा-

हे प्रकरण वेगळेच असल्याने जत पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. तपासात कर्नाटकातील विजापूर येथे त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना नाना लोखंडे याचा खुन झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने त्यांनी चौकशी सुरू केली होती.

काय आहे नेमके प्रकरण :

नाना लोखंडे याचे मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. असे असताना दुसऱ्या मामाच्या मुलीला त्याने पळवून आणल्याने मागील आठवड्यात खिलारवाडी येथे त्या मामाचा व नाना याचा वाद झाला होता. याच कारणातून नाना लोखंडे याचा खून झाला आहे. यामध्ये मामा सहित तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना साथ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. जत पोलिसांनी मंगळवारी नाना लोखंडे याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला असून त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'..तो जवळ आला अन् स्पर्श करून..' मराठी अभिनेत्रीनं सांगितला वाईट अनुभव, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Crime : भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; माजी आमदारासहित १२ जणांना अटक

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

SCROLL FOR NEXT