Atique Ahmed News Saam TV
महाराष्ट्र

Atique Ahmed Life Imprisonment: अतीक अहमदच्या पापाचा घडा भरला; उमेश पाल अपहरण प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

न्यायालयाने या सातही व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Prayagraj Court News: गँगस्टर अतीक अहमदला २००६ च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी अतीक अहमद याच्यासह अन्य तीन आरोपींना एमपी-एमएलए कोर्टाचे न्यायाधीश डॉ. दिनेश चंद्र शुक्ला यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Umesh Pal kidnapping Case)

या प्रकरणी अन्य ७ आरोपींवर न्यायालयात खटला सुरू होता. न्यायालयाने या सातही व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे. आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी साक्षीदार असलेल्या उमेश पालचे अपहरण करत हत्या करण्यात आली. या प्रकरणील पाल कुटुंबीयांनी अतीकला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.

अतीक आणि त्याच्या कुटुंबाने आजवर अनेक घरांची राखरांगोळी केली आहे. त्याची पत्नी आणि पाचही मुलांवर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. उमेश पाल अपहरण आणि हत्या प्रकरणी त्याच्यावर १७ वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. अखेर आज न्याय मिळाल्याने उमेश पाल यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झालेत.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी केला खून

अतीक अहमदने साल १९७९ पासूनच गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. तो १७ वर्षांचा असताना आपल्या कुटुंबासह अलाहाबाद येथे राहत होता. यावेळी शाळेत नापास झाल्याने त्याने पुढील शिक्षणाकडे देखील पाठ फिरवली. तसेत जास्त पैसे मिळण्यासाठी तो चोरी, अपहरण असे गुन्हे करू लागला. पुढे त्याने मोठ मोठे गुन्हे करण्यास सुरूवात केली आणि एका व्यक्तीचा त्याने खून केला. त्यामुळे गावात अतीकची दहशत निर्माण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT