Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : कामावर जाताना रस्त्यात दुचाकी थांबविली; पेट्रोल काढून अंगावर ओतून स्वतःला घेतले पेटवून

Ulhasnagar News : आज पहाटे चार वाजता घरातून सगळ्यांचा निरोप घेऊन करण हा कामावर जाण्यासाठी निघाला होता. मात्र कंपनीत पोहचण्यापूर्वीच या तरुणाने टोकाचा निर्णय घेत स्वतःला जाळून घेतले आहे.

Rajesh Sonwane

उल्हासनगर : घरातून सर्वांचा निरोप घेऊन कामावर जाण्यासाठी निघाला. मात्र वाटेतच गाडी थांबवून गाडीतून पेट्रोल काढले आणि अंगावर ओतून स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाट्याजवळ घडली आहे. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह पूर्णतः कोळसा झाला होता. 

कल्याणमध्ये वास्तव्यास असलेला करण परब असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. करण हा नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत कामाला होता. रोज कल्याण येथून नवी मुंबईला दुचाकीने कंपनीत जात असायचा. नेहमीप्रमाणे आज पहाटे चार वाजता घरातून सगळ्यांचा निरोप घेऊन करण हा कामावर जाण्यासाठी निघाला होता. मात्र कंपनीत पोहचण्यापूर्वीच या तरुणाने टोकाचा निर्णय घेत स्वतःला जाळून घेतले आहे. 

कर्जबाजारी झाल्याने टोकाचे पाऊल 

कमावर जात असताना नेवाळी परिसरात करणने दुचाकी थांबवून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. दुचाकी थांबविल्यानंतर त्याने दुचाकीच्या टाकीतून एका बाटलीत पेट्रोल काढले. यानंतर हे पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेतले. यावेळी त्याला वाचविण्यासाठी कोणीच नसल्याने काही वेळातच करण जमिनीवर कोसळला. यात पूर्णपणे जळून कोळसा झाला होता. दरम्यान कर्जबाजारीपणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.  

दरम्यान जळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. तर करणच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT