Ulhasnagar Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Vidhan Sabha : महायुतीत भाजप, अजित पवार गटात तेढ; उल्हासनगरमध्ये कार्यकर्ते बंडखोरी करण्याच्या तयारीत

Ulhasnagar News : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी हे भाजपकडून तिकीट मागत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत राजवानी हे देखील इच्छुक आहेत.

अजय दुधाणे

उल्हासनगर : अनेक जागांवरून महायुतीमध्ये तेढ निर्माण झालेला आहे. त्यानुसार उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीतील तेढ अजूनही कायम आहे. या विधानसभा क्षेत्रात उमेदवार निश्चित झालेला नसून भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून देखील उमेदवारीबाबत दावा केला जात आहे. 

उल्हासनगर (Ulhasnagar News) विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी हे भाजपकडून तिकीट मागत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत राजवानी हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदाराचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत येऊ शकले नाही. दरम्यान (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उल्हासनगरमध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भरत राजवानी यांच्या समर्थकांनी भाजपास उल्हासनगर सुटल्यास निवडणुकीत भाजपचे काम करणार नसल्याचे घोषित केले. 

तसेच भरत राजवानी यांना भाजप उमेदवाराविरोधात उभे करू आणि जिंकून आणू; अशी नाराजी या आढावा बैठकीत दिसून आली. मात्र भरत राजवानी यांनी सावध पवित्रा घेत उमेदवारी भाजपला देण्यात आली; तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. अर्थात भाजपला जागा सुटल्यास अजित पवार गटाचे कार्यकर्ते बंडखोरीच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या तरी पाहण्यास मिळत आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT