Ulhasnagar School Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar School : उल्हासनगरात हिरकणी कक्षात स्तनपान नव्हे तर मद्यपान; महापालिका शाळेतील धक्कादायक प्रकार

Ulhasnagar News : उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक २९ आहे. या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे ३ हिरकणी कक्ष ठेवण्यात आले आहेत

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगरात महापालिका शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे. मात्र हा हिरकणी कक्ष दारूच्या पार्टीसाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत? की मद्यपानासाठी? असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक २९ आहे. या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे ३ हिरकणी कक्ष ठेवण्यात आले आहेत. यापैकीच एका कक्षात आज दुपारच्या सुमारास काही इसम दारू पीत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता दारू पिणारे इसम तिथून पळून गेले. 

दारूच्या बाटल्या सोडून पसार 

दारूची पार्टी करणारे पळून गेले मात्र जाताना दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी सोडून गेले. दरम्यान हे इसम नेमके कोण होते? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून काही जणांच्या मते ते महापालिकेचे सफाई कामगार असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर शाळेच्या आवारात हा प्रकार सुरू असतानाही शाळा प्रशासनाला त्याची माहिती कशी नव्हती? शाळेला महापालिकेची सुरक्षाव्यवस्था नव्हती का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. 

विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर 

दरम्यान शाळांमध्ये देखील अनुचित प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशात उल्हासनगरमधील शाळांमध्ये दारूच्या पार्टी होत असल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी दिली आहे. तसंच या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT