Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : धक्कादायक.. भाडे देत नसल्याने दुकान मालकाकडून हत्या; उल्हासनगरातील मध्यरात्रीची घटना

Ulhasnagar News : अंबरनाथमधील जावसे गावात राहणारे इलीइस जकात शेख हे उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक एक येथील ए वन तबेला जवळ एक दुकान भाड्याने घेऊन सलून चालवत होते

अजय दुधाणे

उल्हासनगर : दुकानाचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या दुकान मालकाने सलून चालकाची हत्या केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील ए वन तबेला या परिसरात घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली असून या प्रकरणी दुकान मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,

अंबरनाथमधील (Ambarnath) जावसे गावात राहणारे इलीइस जकात शेख हे उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक एक येथील ए वन तबेला जवळ एक दुकान भाड्याने घेऊन सलून चालवत होते, दरम्यान गुरुवारी (५ सप्टेंबर) मध्यरात्री दुकानाचे मालक शेरा माखीजा हे दुकानात आले. त्यांनी इलीइस जकात शेख यांच्याकडे दुकानाच्या भाड्याची मागणी केली. यावेळी दुकानाचे भाडे एक दोन दिवसात (Crime News) देतो असे इलीइस ने शेरा यांना सांगितले. इतक्यातच शेरा माखीजा यांनी सलून चालक इलीइस पोटात चाकूने वर केला. यात दुकान चालक गंभीर झाला होता. 

संशयित पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान घटनेत इलीइस हा गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शेरा माखीजा याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT