Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : दारू पिऊन गाडी चालविणे पडले महागात; पाच जणांची कारागृहात रवानगी

Ulhasnagar News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून या अनुषंगाने उल्हासनगर शहरात वाहतूक पोलिसातर्फे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : पोलिसांकडून सध्या वाहन तपासणी मोहीम जोरदार करण्यात आली आहे. यामध्ये (Ulhasnagar) उल्हासनगर शहरात पोलिसांना दारू पिऊन गाडी चालविणारे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून या अनुषंगाने उल्हासनगर शहरात वाहतूक पोलिसातर्फे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात वाहतूक विभागातर्फे (Traffic Police) रोज नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया केल्या जात आहेत. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर (Ulhasnagar Police) गेल्या तीन महिन्यात वाहतूक पोलिसांनी एकूण ७९ चालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी ही एक मोहीम सुरू केली असून या मोहिमेद्वारे रविवारी ड्रंक अँड ड्राईव्ह या केसमध्ये सात जणांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांनी भरली दंडाची रक्कम 

दरम्यान सोमवारी या सात जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या मद्यपी चालकांना दहा हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा केली. तसेच सात पैकी फक्त दोन चालकांनी दहा हजार रुपये दंड भरला आणि ज्या चालकांनी दंडाची रक्कम नाही भरली नाही; त्यांची रवानगी उल्हासनगर न्यायालयाने कल्याण येथील आधारवाडी कारागृहात केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakista: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

प्रसादाच्या गुंगीतून लैंगिक शोषण; SITच्या चौकशीत अशोक खरातचे भयंकर कारनामे उघड, VIDEO

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT