Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : कार चालकाने दुचाकीला धडक देत दुचाकीस्वराच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न; कट मारल्याचा जाब विचारल्याचा राग

Ulhasnagar news : गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला कारचा कट लागला. यामुळे दुचाकीस्वाराने याबाबत कार चालकाला विचारणा केल्याचा राग आल्याने कार चालकाने दुचाकीला धडक दिली

अजय दुधाणे

उल्हासनगर : गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला कारचा कट लागला. यामुळे दुचाकीस्वाराने याबाबत कार चालकाला विचारणा केल्याचा राग आल्याने कार चालकाने दुचाकीला धडक दिली. इतकेच नाही तर दुचाकीवरून खाली पडलेल्या तरुणाच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.  

कल्याण पूर्वेतील विशालनगरी परिसरात राहणारा तरुण रोहन शिंदे हा आपल्या मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी (Ulhasnagar News) उल्हासनगरमधील हिरा घाट पेट्रोल पंपच्या दिशेने जात होता. दरम्यान रस्त्यावर एका चार चाकी कारने रोहनच्या दुचाकीला कट मारला. रोहनने गाडी पुढे घेत चार चालकाला हळू चालवण्यास सांगून पुढे निघून गेले. मात्र हिरा घाट परिसरात कार चालक त्यांच्या पाठीमागे आला. त्याने रोहनच्या बाईकला धडक दिली. यामुळे रोहन खाली पडला. इतकेच नव्हे कार चालकाने रोहनच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. दोनदा कार चालकाने कार चालविली. 

तक्रार देऊनही गुन्हा दाखल नाही 

या दरम्यान रोहन पेट्रोल पंप कार्यालयात पळत गेल्याने तो बचावला. या प्रकरणी रोहन आणि त्याचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी (Ulhasnagar Police) उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशनला गेले. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही असून देखील गुन्हा दाखल केला नाही. अद्याप सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT