Ulhasnagar Latest Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ulhasnagar News : भयंकर! भररस्त्यात तरुणाला भोसकलं, मूठ तुटल्याने चाकू पाठीतच अडकला; उल्हासनगरात खळबळ

Ulhasnagar Latest Crime News : आरोपीने तरुणाला वाटेतच अडवून त्याच्या पाठीत चाकू खुपसला. मूठ तुटल्याने हा चाकू तरुणाच्या पाठीतच अडकून पडला.

अजय दुधाने

जेवणाचं पार्सल घरी घेऊन निघालेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उल्हानगर शहरात घडली. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपीने तरुणाला वाटेतच अडवून त्याच्या पाठीत चाकू खुपसला. मूठ तुटल्याने हा चाकू तरुणाच्या पाठीतच अडकून पडला. आरडाओरड झाल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले.

त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पाठीत अडकलेला चाकू बाहेर काढलाय.

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सौरभ म्हात्रे असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी (Ambarnath Police) आरोपी रोहन उर्फ वाघ्या याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या (Ulhasnagar News) वडोल गावात राहणारा सौरभ म्हात्रे हा सोमवारी रात्रीच्या सुमारास जेवणाचं पार्सल घेऊन घराकडे निघाला होता. वडोलगाव सेंट जोसेफ शाळेजवळ तो आला असता, वाटेतच त्याला रोहन जाधव उर्फ वाघ्या याने थांबवलं. कोरोना काळात आपला वाद झाला होता त्याबद्दल मला बोलायचं आहे, असं म्हणत आरोपीने सौरभची वाट अडवली.

मात्र मला घरी जायचं आहे उशीर होत आहे नंतर बोलूया, असं म्हणत सौरभ दुचाकीवर बसला. त्यावेळी आरोपी रोहन याने जुन्या वादाचा राग मनात धरून जीवे ठार मारच्या उद्देशाने त्याचा जवळ असलेल धारदार चाकू सौरभला पाठीत खुपसला. त्याचवेळी मूठ तुटल्याने चाकू सौरभच्या पाठीत अडकून पडला.

या घटनेनंतर सौरभने आरडाओरड सुरू केली. तेव्हा आजूबाजूला असलेले लोक त्याच्या मदतीसाठी धावले. नागरिक येत असल्याचं बघताच आरोपी रोहन याने घटनास्थळावरून धूम ठोकली. स्थानिकांनी सौरभला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. शस्त्रक्रियेनंतर सौरभच्या पाठीत अडकलेला चाकू डॉक्टरांनी बाहेर काढला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT