Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : मुलाला का मारतात म्हणून विचारायला गेलेल्या आई- वडिलांना जबर मारहाण

Ulhasnagar News : मारेकऱ्यांनी मुलाला सोडून दहा ते बारा जणांनी फावडा, लोखंडी रॉडने अनिल गोंडे याला जबर मारहाण केली

अजय दुधाणे

उल्हासनगर : घराच्या बाहेर खेळणाऱ्या मुलाला काही जण मारत असल्याचे दिसले. यानंतर त्या मुलाचे आई- वडील (Ulhasnagar) धावत जात मुलाला का मारताय म्हणून संबंधिताला जाब विचारला. यानंतर आई- वडिलांना देखील जबर मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर कॅम्प तीनमध्ये घडला आहे. (Breaking Marathi News)

उल्हासनगर कॅम क्रमांक तीन येथील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली आहे. मुलाला का मारतात म्हणून जाब विचारायला गेला असता दहा ते बारा जणांनी आई आणि वडिलांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Crime News) अनिल गोंडे यांचा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याला काही जण मारत असल्याचे पाहिल्यावर अनिल गोंडे आणि त्यांची पत्नी मुलाला का मारतात? असा जाब विचारला. यानंतर मारेकऱ्यांनी मुलाला सोडून दहा ते बारा जणांनी फावडा, लोखंडी रॉडने अनिल गोंडे याला जबर मारहाण केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मारहाणीत अनिल गोंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पत्नीस उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र शास्त्रीनगर भागात गुंडगिरी वाढली असून त्याला मध्यवर्ती पोलीस आल्याने या परिसरात (Police) पोलिसांची गस्त वाढण्याचची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT