Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात १२ लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त; ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई

Ulhasnagar News : उल्हासनगरात ड्रग्ज डीलर्स एमडी ड्रग्ज घेऊन कॅम्प २ मधील साईबाबा मंदिराजवळ येत असल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे हवालदार अमोल देसाई यांना गुप्त माहितीदारांकडून मिळाली होती

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एमडी ड्रग्जची तस्करी करण्याची मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईत दोघांना ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

शाफिकुर रेहमान खान आणि आरिफ खान अशी अटक केलेल्या ड्रग्ज डीलर्स तस्करांची नावे आहेत. उल्हासनगरात दोन ड्रग्ज डीलर्स एमडी ड्रग्ज घेऊन कॅम्प २ मधील साईबाबा मंदिराजवळ येत असल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे हवालदार अमोल देसाई यांना गुप्त माहितीदारांकडून मिळाली होती. त्यानुसार अँटी नार्कोटिक्स सेलने कारवाई करण्यासाठी सदर ठिकाणी सापळा रचला. 

११ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

या कारवाईत आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि शफिकुर रेहमान सिराज अहमद खान या दोघांना पथकाने ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याकडे ५८.१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसह पदार्थासह एकूण ११ लाख ९४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरु असून या मागे मोठे रॅकेट आहे का? याचा तपास सुरु करण्यात आला आहे. 

अंबरनाथमध्ये चड्डी गँगची बारमध्ये चोरी
अंबरनाथ
: अंबरनाथमध्ये चड्डी गँगने एका बारमध्ये चोरी केली आहे. पत्रे फोडून बारमध्ये प्रवेश करत या दुकलीने काऊंटरमधले ७० हजार रुपये चोरून नेले आहेत. अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनाका परिसरात राजस पिसाळ यांचा साई सागर बार आहे. या बारमध्ये ६ फेब्रुवारीच्या पहाटे अंगात फक्त चड्डी घातलेले २ चोरटे पत्रे फोडून घुसले. त्यांनी बारच्या काऊंटरमधून ७० हजार रुपये चोरून नेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT