Ulhasnagar crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar crime : पूर्ववैमनस्यातून दोन जणांवर जीवघेणा हल्ला; उल्हासनगरमध्ये रात्रीची घटना

Ulhasnagar News : चार जणांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत

अजय दुधाणे

उल्हासनगर : जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने उल्हासनगरमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास दोन जणांवर जीवघेणा हल्ला (Crime News) करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलिसात (Ulhasnagar) दाखल तक्रारीवरून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. (Tajya Batmya)

उल्हासनगरमधील धोबीघाट परिसरात २२ जानेवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मुकेश अग्रवाल तरुण गंभीर जखमी झाला असून प्रमोद अग्रवाल हे किरकोळ जखमी झाले आहे. धोबीघाट परिसरात मुकेश व प्रमोद हे आले असता त्यांच्यावर तलवार, चॉपर व कोयत्याने वार करण्यात आले. चार जणांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु 

मुकेश व प्रमोद अग्रवाल यांच्यावर झालेला हा हल्ला पूर्व वैनस्यातून केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून या प्रकरणी उल्हासनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT