Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : कचरा टाकण्यावरून वाद; शेजाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण

Ulhasnagar news : घराबाहेर कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये मारामारी झाली.

अजय दुधाणे

उल्हासनगर : घराबाहेर कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये मारामारी झाली. या वादातून झालेल्या हाणामारीत शेजाऱ्याने तरुणाला बेदम मारहाण करत जबडा तोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयिताचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प २ मधील आझाद नगर परिसरात हि घटना घडली आहे. आझाद नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या रामबाबू यादव आणि त्यांचा पुतण्या अमरसिंह यांचे काही दिवसांपूर्वी शेजारी राहणारे प्रभू गुप्ता आणि नितेश गुप्ता यांच्याशी कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद झाले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या वाद पुन्हा उफाळून काढत जुन्या रागातून प्रभू गुप्ता आणि नितेश गुप्ता या दोघांनी रामबाबू आणि त्यांचा पुतण्या अमरसिंह या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत अमरसिंह याचा जबडा तुटला असून त्याला मोठी दुखापत झाली आहे. 

दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल 

शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अमरसिंह या तरुणाचा जबडा तुटला आहे. जबर जखमी झालेल्या तरुणावर सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर मारहाण करणारे प्रभू गुप्ता आणि नितेश गुप्ता हे फरार झाले आहेत. तर याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून (Ulhasnagar Police) उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या दोघांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे पोलीस दलात 19 जणांची भरती; 5 टक्के आरक्षणाचा गैरफायदा

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

Pune News: पुण्यात डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं

Traditional Vati Mangalsutra: मराठमोळ्या लूकवर उठून दिसेल पारंपरिक वाटी मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT