Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : भंयकर! ३ वर्षीय मुलगी ४ दिवसांपासून होती बेपत्ता, उल्हासनगरच्या टेकडीवर अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

Ulhasnagar News : उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या ३ मुलींसह वास्तव्याला आहे. ही महिला १८ नोव्हेंबरला डॉक्टरकडे जात असताना तिची मुलगी बेपत्ता झाली होती

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३ वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आला असून घटनेनंतर नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात गोंधळ घालत कारवाईची मागणी केली आहे. 

उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या ३ मुलींसह वास्तव्याला आहे. ही महिला १८ नोव्हेंबरला डॉक्टरकडे जात असताना तिची मुलगी बेपत्ता झाली होती. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर चार दिवसांनी आज प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत पाहणी केली. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का? तिची फक्त हत्या झाली आहे? की त्यापूर्वी तिच्यासोबत काही दुष्कृत्य सुद्धा झालं आहे? या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. 

नागरिकांचा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ 

दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. सदरचे कृत्य ज्याने कुणी केलं आहे, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बेपत्ता मुलीच्या आईसह स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तर परिसरातील महिलांनीही चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

SCROLL FOR NEXT