UPI CHARGE PROTEST saam tv
महाराष्ट्र

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात

Ulhasnagar Traders Oppose Proposed 0.4 Percent UPI MDR Charge: उल्हासनगर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी UPI व्यवहारांवरील प्रस्तावित 0.4 टक्के शुल्काला विरोध केला आहे. निषेध म्हणून काही व्यापाऱ्यांनी दुकानांवरील UPI फलक आणि QR कोड हटवण्यास सुरुवात केली आहे.

Omkar Sonawane

अजय दुधाणे, साम टीव्ही

UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4 टक्के शुल्क (MDR) आकारण्याच्या निर्णयाला उल्हासनगर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या शुल्कामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांचेही नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काही व्यापाऱ्यांनी दुकानांवरील UPI पेमेंटचे फलक आणि QR कोड हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा रोखीने व्यवहार करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, वस्तूंच्या विक्रीवर आधीच GST भरला जात असताना UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लावणे हा आणखी आर्थिक भार ठरेल.

दररोज कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर शॉपकीपर असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हे शुल्क मागे घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान नागपुरातील चितारओळी परिसरात UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या मागणीविरोधात काँग्रेसच्या व्यापारी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. UPI वरील शुल्काचा प्रस्ताव मागे घ्या, अशी जोरदार मागणी करत कार्यकर्त्यांनी परिसरात घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Saturday Horoscope : ६ राशींची होणार चांदी; कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Saree Colour Tips: साडीत दिसाल एकदम स्लिम अन् गॉर्जियस! बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करतात हा सिक्रेट कलर फॉर्म्युला

8th Pay Commission : 3.83 किंवा 4.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती वाढेल पगार? जाणून घ्या गणित

SCROLL FOR NEXT