Uddhav Thackreay Ajit Pawar 
महाराष्ट्र

आज मुख्यमंत्री साता-यात, उपमुख्यमंत्री काेल्हापूरात

Siddharth Latkar

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Uddhav Thackreay Ajit Pawar हे आज (सोमवार) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे दुपारी दीड वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागास भेट देतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सायंकाळी सहा वाजता साता-यात पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेणार आहेत. (uddhav-thackreay-ajit-pawar-visit-kolhapur-satara-sangli-koynanagar-flood-affected-areas-sml80)

मुख्यमंत्री ठाकरे हे आज (साेमवार) सकाळी पावणे अकरा वाजता पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता. पाटण) येथे प्रयाण करतील. तेथून हवाई पाहणी झाल्यानंतर साडे अकरा वाजता काेयनानगर हेलिपॅड (ता. पाटण येथे) त्यांचे आगमन हाेईल. सकाळी 11.35 वाजता ते मोटारीने जिल्हा परिषद शाळा, कोयनानगरला जातील तेथून कोयनानगर परिसरातील महापुरातील बाधित लोकांच्या छावणीस भेट व मदत वाटप करतील.

दुपारी 12.15 वाजता कोयनानगर विश्रामगृह येथे सातारा जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक हाेईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर ते दुपारी हेलिकॉप्टरने पुणे विमानतळकडे प्रयाण करतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे काेल्हापूर, सांगली, सातारा असा आज (साेमवार) दाैरा करणार आहेत.

त्यांचा नियाेजीत दाैरा असा असेल.

सकाळी 09.00 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन

सकाळी 09.15 वाजता पूरग्रस्त परिसर पाहणी

१) शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट.

२) शिवाजी पूल पूरग्रस्त परिसर पाहणी

सकाळी 10.15 वाजता कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक.

( स्थळ- शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर)

सकाळी 11.30 वाजता हेलिकॉप्टरने शिरोळकडे प्रयाण.

दुपारी 12.00 वाजता शिरोळ परिसर पूरग्रस्त पाहणी.

दुपारी 01.15 वाजता हेलिकॉप्टरने पलूसकडे प्रयाण.

दुपारी 02.15 वाजता पलूस परिसर पूरग्रस्त पाहणी.

दुपारी 03.45 वाजता सांगली जिल्हयातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक.

(स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सायंकाळी सव्वा पाच वाजता साता-याकडे येतील. सायंकाळी सहा वाजता ते सातारा जिल्हयातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे घेतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT