Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिवसेना विलीन होणार, भाजप प्रवक्तव्याचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray Shiv Sena Latest News : उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. विलीनीकरणाच्या बदल्यात संजय राऊत यांना खासदारकी मिळेल, असा खोचक टोला लगावला.

Ganesh Kavade

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (AP) मधील २०-२२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. त्याला उत्तर देताना नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे. "येत्या काही दिवसांत ठाकरे गटाचे संपूर्ण विलीनीकरण काँग्रेसमध्ये केले जाईल आणि त्या बदल्यात संजय राऊत आपली खासदारकी मिळवतील," अशी बोचरी टीका बन यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेताना नवनाथ बन बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काँग्रेसचाच अजेंडा राबवण्याचा आरोप:

सध्या ठाकरे गटाकडून काँग्रेसचाच अजेंडा राबवला जात आहे. संजय राऊत हे स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा 'मर्जर-मर्जर'चा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला, तर ठाकरे गटाला नक्कीच गोल्ड मेडल मिळेल,असा टोला बन यांनी लगावला.

दुसऱ्या पक्षांच्या विलीनीकरणावर भाष्य करण्यापेक्षा राऊत यांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होणार, याचा मुहूर्त जाहीर करावा, असे आव्हान बन यांनी दिले.

मॅच फिक्सिंगची सवय:

कोणतेही विलीनीकरण हे दोन्ही बाजूंच्या संमतीने होत असते, तिथे मॅच फिक्सिंग चालत नाही. मात्र, सट्टा लावण्याची आणि मॅच फिक्सिंग करण्याची राऊत यांना जुनीच सवय आहे, अशा शब्दांत बन यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलताना बन म्हणाले की, या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सुनेत्रा पवार आणि शरद पवार हे दोघेही सक्षम आहेत. शरद पवारांना स्वतःची भूमिका मांडता येत नाही म्हणून राऊत त्यांची वकिली करत आहेत का? पवार साहेबांच्या राजकारणाबाबत कोणीही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मावळतील नॅशनल इंजिनिअरिंग हेवी कंपनीचे 15 तारखेला करणार गृहमंत्री अमित शहा भूमिपूजन

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी का ठेवतात?

Central Government : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारी पैशात मिळणार १.८ लाखांपर्यंत लॅपटॉप, पात्रता काय? वाचा

UP Elections : विधानसभा निवडणुकीआधी पहिली ठिणगी; भाजपला पर्याय तिसऱ्या आघाडीचा; मुख्यमंत्रि‍पदाचा चेहराही ठरला

SCROLL FOR NEXT