Uddhav Thackeray gears up for a crucial Yavatmal visit to address party workers amid the Shiv Sena crisis. saam tv
महाराष्ट्र

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी टाकला टॉप गिअर; खासदारांच्या बंडखोरीनंतर उचललं सर्वात मोठं पाऊल

Uddhav Thackeray Yavatmal Visit After Shiv Sena split: शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदारांच्या बंडखोरीनंतर 27 जूनला यवतमाळ दौरा. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी थेट संवाद साधणार.

Omkar Sonawane

संजय राठोड, साम टीव्ही

शिवसेना ठाकरे गटात आता घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर पक्षाला भगदाड पडू नये आणि संघटना मजबूत राहावी, यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत. येत्या 27 जून रोजी उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत.

बंडखोरीनंतर डमेज कंट्रोलवर भर

ऑपरेशन टायगर अंतर्गत 9 पैकी 6 खासदार फुटल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष अधिक तीव्र झालाय. शिवसेनेच्या वर्धपान दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी या फुटलेल्या खासदारांच्या मतदारांची जाहीर माफी मागितली. याच पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांमधील आणि पदाधिकाऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी थेट यवतमाळमध्ये येऊन परिस्थिती हाताळणार आहेत. हा दौरा प्रामुख्याने डॅमेज कंट्रोल आणि संघटनात्मक बांधणीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

उद्धव ठाकरे यवतमाळमधील सर्व प्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेणार असून त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. बंडखोरीमुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये यासाठी ठाकरे स्वतःत्यांना मार्गदर्शन करून पक्षात नवी ऊर्जा निर्माण करणार आहेत.

संजय देशमुखांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच यवतमाळ दौरा असल्याने, सर्वांचे लक्ष या दौऱ्याकडे आणि यवतमाळात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागले आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतात आणि कोणती नवी रणनीती आखतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT