महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'येतो झाकी है और बहुत कुछ बाकी है' राजन साळवींच्या पक्षप्रेवशावर शिंदे सेनेच्या नेत्याचे वक्तव्य

Ramdas Kadam: उद्धव ठाकरेंकडे कोणी शिल्लक राहणार नाही. हम दो हमारे दो एवढेच शिल्लक राहणार. मातोश्रीकडे बाकी कोणी शिल्लक राहणार नाही. येतो झाकी है और बहुत कुछ बाकी है रामदास कदम म्हणाले.

Dhanshri Shintre

राजन साळवींनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की, उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे. राजन आणि माझे सख्ख्या भावासारखे संबंध आहेत. काल मला त्याचा फोन आला होता, मला समाधान वाटलं. आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत या म्हणून फोन नाही केला. त्यावेळी बोललो असतो तर बदल झाला असता. काल मला त्यांनी फोन करून सांगितलं भाई मी तुमच्यासोबत येतोय माझ्यावर लक्ष ठेवा. काही काळजी करू नको असं मी सांगितलं.

वैभव नाईक आणि माझेही संबंध जवळचे आहेत, पण मी त्याला आतापर्यंत कधीही फोन केला नाही. आम्ही भूमिका का घेतली हे काही लोकांना आता कळतंय. उद्धव ठाकरे सोबत कोणीच शिल्लक राहणार नाही मी आधीच बोललो होतो. राजन साळवींच्या पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सणसणीत राजकीय कानफटात लागली. अजून पुष्कळ लोक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. उद्धव ठाकरेंकडे कोणी शिल्लक राहणार नाही. हम दो हमारे दो एवढेच शिल्लक राहणार. मातोश्रीकडे बाकी कोणी शिल्लक राहणार नाही. येतो झाकी है और बहुत कुछ बाकी है रामदास कदम म्हणाले.

कधी कधी सत्य पचत नसतं अशी अवस्था संजय राऊत यांची झाली आहे असंही रामदास कदम म्हणाले. त्यांनी पुरस्कार दिला नालायक आहेत असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का? शरद पवारांवर ती बोलायची यांची संजय राऊत आणि विनायक राऊत यांची औकात नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद नव्हते. बोलतात ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात. शरद पवार आणि बोलले ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे फक्त नोटंकी आहे मात्र यात काही तथ्य नाही. शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे आहे प्रचंड आहे. पवारांना ठाण्याचा नाही संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास आहे. आपण कोणावर काय बोलतो याचं भान संजय राऊत आणि ठेवलं पाहिजे असेही रामदास कदम म्हणाले आहेत.

दरम्यान, राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायचे. स्वतःच स्वतःला एखादी बिरू दावली लावतो, सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटतं नंतर विषय चेष्टेचा होतो. हा निष्ठावान ही बिरुदावली तुम्हाला लावावी का? हे राजन साळवींना विचारा भास्कर जाधव यांचा राजन साळवींना टोला लगावण्यात आला आहे. राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही, तिथे विरोध कोणी केला. आता सामंत बंधूनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहित नाही. पण आता हे स्वागत आहे की त्याना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे हे येत्या काळात दिसेल भास्कर जाधव यांनी सामंत यांना टोला लगावला आहे.

उद्धव साहेबांचे लोक फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर. आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं. याचा मला अभिमान आहे. जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे. उद्धव साहेब ठाकरे यांना त्रास घ्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जाताहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करताहेत. काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे वळविलं जातंय, दबाव आहे. केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे, एवढं होऊनही उद्धव ठाकरे बधत नाहीत, खचले नाहीत, हात टेकले नाहीत. त्यामुळे झोप उडाली आहे, अभी भी टायगर जिंदा है, ही भीती त्यांच्या मनात आहे. जाणाऱ्यांना जाऊदे असं पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हणणं योग्य आहे असेही भास्कर जाधव म्हणाले.

पण पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या नेत्यांनी वापरणं योग्य नाही. नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भास्कर जाधव यांच्याकडून टोला लगावण्यात आला आहे. जाणाऱ्यांना मागे कसं फिरवता येईल, ते हिमतीने कसे उभे राहतील अशा पद्धतीचा मंत्र देणं आवश्यक आहे. जातील त्यांना जाऊ द्या असं म्हणणं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. आपसांत एकमेकांवर बोलण्याची आवश्यकता नाही. संघर्षच जर करायचा असेल तर विरोधकांबरोबर करा असं भास्कर जाधव म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT