Uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; EC विरोधात आता हायकोर्टात जाणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे हायकोर्टात जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हायकोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) आजच रिट याचिका दाखल केली जाणार आहे. निवडणूक आयोगानं सुनावणी घेतली नाही, ठाकरे गटाचा युक्तीवाद मांडण्याची संधी दिली नाही अशा प्रकारची भूमिका दिल्ली हायकोर्टामध्ये उद्धव ठाकरे मांडण्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? हा तिढा सुप्रीम कोर्टात प्रलंबीत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवलं आहे.

शनिवारी निवडणुक आयोगाने हा निर्णय दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला ठाकरे गट हायकोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली हायकोर्टात आजच रिट याचिका दाखल केली जाणार आहे. त्यामुळे आता दिल्ली हायकोर्टात कधी सुनावणी होते आणि काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची डीग्री सार्वजनिक करावी; अभिजीत दिपके असं का म्हणाले? VIDEO

Fake Currency : भरधाव कार थांबवली अन पोलिसांचे डोळेच पांढरे झाले! बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश

केस गळती कमी करण्यासाठी सोपे 5 उपाय

Maharashtra News Live Update: परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT