Uddhav Thackeray Vs Raj Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : ठाकरे विरुद्ध ठाकरे राडा; उद्धव ठाकरेंसाठी जितेंद्र आव्हाड तर राज ठाकरेंसाठी शिंदे मैदानात

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा झाल्यावरून राजकारण तापलंय. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी तर जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरलेत.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा झाल्यावरून राजकारण तापलंय. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी तर जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरलेत. त्यावरचा हा खास रिपोर्ट....

राज ठाकरेंच्या गाडीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशाराच दिलाय. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर ठाण्यातील सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांनी शेण, टोमॅटो आणि नारळ फेकले आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष आणखीच टोकाला गेला. त्यातच अॅक्शनला रिअॅक्शन असते,असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी मैदानात उतरले. तर 2 महिने थांबा अॅक्शनला रिअॅक्शन काय असते दाखवतो, असा इशाराच संजय राऊतांनी दिलाय.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरलेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आपसात अनेकदा भिडले मात्र थेट नेत्यांना कधीच टार्गेट केलं गेलं नाही. बीडमधल्या सुपाऱ्या आणि ठाण्यातील राडा यामुळे राजकारण मात्र चांगलंच पेटलंय. आता हा वाद शमवण्यासाठी ठाकरे बंधूंनी आपापल्या कार्यकर्त्यांना समजावून महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपायला हवी. अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT