Uddhav Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ठाकरेंना व्हायचंय पुन्हा मुख्यमंत्री ? उद्धव ठाकरेंची दिल्लीतून गुगली, मविआतील मित्रपक्षांची गोची?

Maharashtra Politics 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी विचारलं असता त्यांनी ती पुन्हा मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.

Tanmay Tillu

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

बातमी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची...उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात ठाकरेंनी मविआच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरून गुगली टाकलीय. त्यामुळे मविआतील अनेकांच्या भुवया उंचावल्यात...यामुळे मात्र उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय का? यावरचा हा रिपोर्ट...

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी आपल्याच मित्रपक्षांना गुगली टाकलीय. ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून मविआतल्या नेत्यांच्या नक्कीच भूवया उंचावल्या असतील.

मविआ सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हतो असा दावा उद्धव ठाकरे करत असतात...शरद पवारही याला दुजोरा देता आणि आपल्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचंही सांगता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मविआचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी ठाकरे गटच सर्वाधिक आग्रही आहे. आणि आता उद्धव ठाकरेंचीही पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली आहे.

त्यामुळेच मविआतल्या मित्रपक्षांनी आधी केलेल्या कौतुकाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून गुगलीही टाकलीय आणि आपली इच्छाही बोलून दाखवलीय. त्यामुळे मविआ ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करणार की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT