Uddhav Thackeray Speech Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray on Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या होम पिचवर उद्धव ठाकरेंची तुफान बॅटिंग; भरसभेत खिशातून मोबाइल काढून व्हिडिओच लावला

Uddhav Thackeray Speech : विकास देशाचा नाही त्यांचाच होतो आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आहेत. दरम्यान त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

काल परवापर्यंत आपल्यासोबत होते ते आज सरकारमध्ये आहेत. त्यांना अचानक साक्षात्कार झाला जो काय विकास होतोय तो भाजपमुळेच होतोय. अचानक ते (पीएम मोदी) विकासपुरुष वाटू लागले आहेत. मात्र विकास देशाचा नाही त्यांचाच होतो आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शेतकऱ्यांना घर, जमीन, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज घ्यावं लागत आहे. याला दुर्भाग्य म्हणावं नाहीतर काय म्हणावं. माझी खुर्ची काढून घेतली म्हणून संताप येतोय असं नाही. मात्र तुम्ही जी खुर्ची उबवताय, त्यात फक्त रक्तापिपासू ढेकणं तयार होत आहेत, याचा तुम्ही अंदाज घेताय की नाही, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांनी झाली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ उपस्थितींना ऐकवला.

एकवेळ सत्तेशिवाय राहू, मात्र राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. मात्र त्यांच्याचसोबत आज आहेत. तुमच्या नागपूरला हा कलंक आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT