Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासही उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर

शिंदे गटाचं बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Uddhav Thackery Aurangabad Visit: हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरवल्याने मराठवाड्यात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचं बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा....

दुपारी 12.15 वा. औरंगाबाद विमानतळाहुन दहेगाव ता. गंगापुर कडे प्रयाण

दुपारी 01.00 वा. दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी

दुपारी 01.15 वा. पेंढापूर ता. गंगापुरकडे प्रयाण

दुपारी 01.30 वा. पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन व पीक नुकसानीची पाहणी

दुपारी 01.45 वा. पत्रकारांशी संवाद

दुपारी 02.45 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद प्रयाण

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT