Uddhav Thackeray Press Conference At Worli Saamtv
महाराष्ट्र

Thackeray Group Press Conference: विजय आमचाच, ठाकरेंची गॅरंटी!, जनता न्यायालयात सन २०१३ आणि २०१८ चे व्हिडिओ पुरावेच दाखवले

Uddhav Thackeray Press Conference At Worli: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १९९९चीच घटना शेवटची आहे, असे मानत जो निकाल दिला होता, तो दावाच आता खोडून काढला आहे.

Gangappa Pujari

विनय म्हात्रे, मुंबई|ता. १६ जानेवारी २०२४

Shivsena Thackeray Group Press Conference:

मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे ठाकरे गटाची महापत्रकार परिषद सुरू आहे. या पत्रकार परिषदेत सर्वात मोठा खुलासा झाला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १९९९चीच घटना शेवटची आहे, असे मानत जो निकाल दिला होता, तो दावाच आता खोडून काढला आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेची २०१३ ला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीचा व्हिडिओच आता ठाकरे गटाने सादर केला आहे. तसेच ठाकरे गटाने २०१८ मधील राष्ट्रीय कार्यकारिणीचाही व्हिडिओ सादर केला.

काय आहे ठाकरे गटाचा दावा...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना संघर्षाचा निकाल देताना १९९९ चीच घटना शेवटची आहे, त्यानंतर पक्षघटनाच तयार झाली नाही, असा दावा केला होता. तो दावाच आता ठाकरे गटाने खोडून काढला आहे. ठाकरे गटाने आजच्या पत्रकार परिषदेत स्क्रिनवर 2013ची राष्ट्रीय कार्यकारिणीचा बैठकीचा व्हिडिओचं सादर केला.

विशेष म्हणजे या सभेत स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीत सुभाष देसाई यांनी ठराव मांडला. त्यांच्या ठरावाला मनोहर जोशी यांनी अनुमोद दिले. तसेच लिलाधर डाके यांनीही अनुमोदन दिले. या बैठकीत सध्या शिंदे गटात असलेले रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा ठराव मांडला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१८ चाही व्हिडिओ समोर आला!

तसेच या वेळी ठाकरे गटाने २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, त्याचाही व्हिडिओ सादर केला. या कार्यकारणीत निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी आलेल्या एकाच अर्जानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निवडून आले आहेत, असे जाहीर करण्यात आले. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) हजर असल्याचे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT