Uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Solapur:शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये; शिवसेनेत केले मोठे बदल

सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे, मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेना पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांत बदल करण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतले नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात.

शिवसेनेला पुन्हा हादरा?

शिवसेनेतील (shivsena) आमदारांचे बंड आता खासदारपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांची काल दिल्लीत बैठक झाल्याचे बोलले जात आहे. कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना वगळून ही बैठक झाली आहे.

काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या बैठकीला तीन खासदारांनी दांडी मारली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेचे तब्बल ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने केला आहे, त्यामुळे दिल्लीतील आजच्या बैठकीने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT