raj and uddhav thackeray x
महाराष्ट्र

Raj Thackeray : ५ जुलैला विजयी सभा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; पण सभेला राज ठाकरे उपस्थित राहणार? 'या' दिवशी कोडं उलगडणार

Maharashtra Politics : हिंदी भाषेचे धोरण रद्द केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैला विजयी सभा किंवा मोर्चा होणार असल्याचे म्हटले. सभेला राज ठाकरे उपस्थित राहणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Yash Shirke

हिंदी भाषेच्या सक्तीसंबंधित दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी केलेल्या घोषणानंतर ५ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मोर्चासंबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आले. हा मोर्चा होणार की नाही असा प्रश्न सामान्य मराठी जनतेला पडला होता. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चासंबंधित माहिती दिली.

हिंदी भाषेच्या धोरणाशी निगडीत जीआर रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाच्या विरोधातील मोर्चा रद्द झाल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ५ जुलै रोजी विजयी सभा किंवा मोर्चा होणार असल्याची घोषणा केली.

उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैच्या विजयी सभेला उपस्थित राहण्याचे सर्वांना आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी सभा होणार असल्याचे म्हटले असले, तरीही राज ठाकरे यांच्याकडून सभेशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. उद्धव यांच्यासह राज ठाकरे देखील विजयी सभेमध्ये उपस्थित राहणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. उद्या मनसे नेत्यांसह ११ वाजता शिवतीर्थावर बैठक संपन्न होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असल्याचे म्हटले जात आहे. उद्या (३० जून) होणाऱ्या बैठकीनंतक राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र दिसणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

महायुती सरकारने त्रिभाषा सूत्रांतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती लागू करण्यासंबंधित दोन्ही जीआर रद्द केले आहे. जीआर रद्द केल्यानंतर आता एक विशेष तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या अहवालावरुन पुढील निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या समितीचे अध्यक्षपद डॉ. नरेंद्र जाधव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT