Shushma Andhare Beed Clash News Saam TV
महाराष्ट्र

Shushma Andhare News: होय... मी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावली; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने जारी केला VIDEO

Shushma Andhare Beed Clash News: बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

विनोद जिरे

Shushma Andhare Beed Clash News: बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला असून ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड (Beed) शहरात २० मे रोजी होत आहे. येथील पारस नगरीत सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आल्या होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी पाठीमागे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली.

वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुकी केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले अप्पासाहेब जाधव?

या वादानंतर अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले 'शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या, असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील एक कानाखाली ठेवून दिली' अशी स्पष्ट माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ करून दिली आहे. (Maharashtra Political News)

शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून विविध वस्तु मागत आहेत. त्यांच्या परळीतील कार्यालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून त्यांना विविध वस्तु दिल्या. आम्ही काही देण्यास नकार दिला, की आमचं निगेटीव्ह वार्तांकन उध्दव साहेबांकडे करीत होत्या".

"या संदर्भात मी स्वतः उध्दव साहेबांना थेट बोललो. त्यांच्या अशा वागणुकीच्या तक्रारी देखील केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा प्रकार सुरूच होता. आज सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी अंधारे यांना मी बाजूला घेऊन या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना मी म्हणालो तुम्ही असे पैसे घेऊन किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का पदे वाट आहात ? त्यावरून त्यांची आणि माझी बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी त्यांच्या कानाखाली ठेऊन दिली".

सुषमा अंधारे यांनी मारहाणीचा दावा फेटाळला

दरम्यान, "शिंदे गटाकडून काही तरी प्लॅन झालेला दिसत आहे. असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का ? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे. अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे". असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिलंय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT