Shrikant Shinde-Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : खासदार श्रीकांत शिंदेविरोधात ठाकरे गट सज्ज, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं प्लानिंग

Political News : खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट देखील निवडणुकांसाठी तयार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत घेरण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात प्रबळ उमेदवार देणार असल्याचं ठाकरे गटाने ठरवलं आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोरिवली मागाठाणे, कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. कल्याण-डोंबिवलीची जागा आपल्याला जिंकायची आहे.उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर निर्धारच केला. (Political News)

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधानसभा संपर्कप्रमुख यांनी कामाला लागावं. बूथ प्रमुख आहेत त्यांना सक्रिय करा, त्यांच्याकडून कामं करून घ्या. मतदारसंघात फिरत राहा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

मतदार यादीत ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून अडचणी जाणून घ्या. ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे, त्यांच्याशी संपर्क करून अडचणी सोडवा. केव्हाही निवडणुका लागू शकतात आपण तयार असायला हवे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT