uddhav thackeray group saamana editorial Criticism pm narendra modi Government  Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: २२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण देशाचं दिवाळं निघालं त्याचं काय?; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात

Uddhav Thackeray On PM Modi: दिवाळी साजरी होणार आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यानंतर गेल्या १० वर्षांत आतापर्यंत किती दिवाळं काढलं या सरकारने सांगावं अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधलाय.

Ruchika Jadhav

Ram Mandir Ayodhya:

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी येत्या २२ जानेवारीला संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा देखील केली आहे. त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं आहे. दिवाळी साजरी करा. पण देशाचं दिवाळं निघालं त्याचं काय?, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यानंतर गेल्या १० वर्षांत आतापर्यंत किती दिवाळं काढलं? ते या सरकारने सांगावं अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधलाय.

राम मंदिराचं उद्धाटन झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत जे दिवाळं वाजलं आहे, त्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. मग तुम्ही चाय पे चर्चा करा, फरसाणवर करा किंवा ढोकळावर चर्चा करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहोत. तसेच गोदावरी काठावर आरती करणार आहोत. 23 तारखेला कार्यकर्त्यांचे अधिवेशन आणि संध्याकाळी जाहीर सभा असणार आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही. आम्ही जेव्हा अयोध्येत होतो तेव्हा ते तिथे होते का? त्यांचं अज्ञान दूर करायला मी येथे आलो नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

AI ची भुतिया सायकल? चालकाशिवाय रस्त्यावर सायकल धावते?

SCROLL FOR NEXT