Uddhav Thackeray On Party Symbol 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Party Symbol: सर्वोच्च न्यायालय शिवसेनेचे 'धनुष्य-बाण' हे चिन्ह परत देईल. जर आपल्याला चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवले जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Bharat Jadhav

  • धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय सकारात्मक निर्णय देईल

  • चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल

  • शिवसेना भवनातील बैठकीत जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना संघटना मजबूत करण्याच्या सूचना

शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव देत चिन्ह देखील बहाल केलं होतं. मात्र आता शिंदे गटाकडे गेलेलं धनुष्यबाण ही चिन्ह आता परत ठाकरे गटाकडे येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनी भाष्य केल असून त्यांनी चिन्हा आपल्याला मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, तसेच विधानसभा मतदारसंघाचे संर्पप्रमुख यांची ऑनलाईन बैठक आज पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन ही बैठक झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टात पक्ष चिन्ह आणि नावाबाबत चालू असलेल्या सुनावणी बाबत उद्धव ठाकरेंनी सुतोवाच केले. पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे, जर चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असे ते यावेळी म्हणालेत.

शिंदे गटाला मिळालं नाव आणि पक्ष चिन्ह

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. पक्षात दोन गट पडले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. एकनाथ शिंदे यांना पक्षातील आमदारांचा जास्त संख्येने पाठिंबा होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नाव आणि पक्षाचे चिन्ह दिलं. दरम्यान पक्षाचं चिन्ह आणि नावावरील दाव्यासंदर्भात २०२२ पासून सुप्रीम कोर्टात केस सुरूय.

यावर नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी न्यायालयात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी पक्षाच्या चिन्हा संदर्भात यावेळी सुप्रीम कोर्टाकडून काही विधानं करण्यात आली.यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्यालाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय.

२०२९ च्या निवडणुकीच्या तयारीला लागा - उद्धव ठाकरे

दरम्यान एसआयआरच्या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशा सूचनाही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्यात. ज्यांना काही कारणास्तव दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी पद सोडावं, त्यांची जबाबदारी इतरांना दिली जाईल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. २०२९च्या निवडणुकीला ३ वर्ष उरली आहेत, निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत.पक्षबांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याच्या सूचना ठाकरेंनी यावेळी दिल्या. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पेपर फुटीत शिक्षण मंत्र्यांचा दोष नाही, योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ; राजीनाम्यावर दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT