UDDHAV THACKERAY'S BIG MOVE IN DHARASHIV saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका! शिंदेंच्या खासदाराविरोधात डाव टाकला, बड्या नेत्याला ठाकरे गटात एन्ट्री

Uddhav Thackeray Inducts Sanjay Nimbalkar Ramashwar Shete 2029 Elections: धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला.

Omkar Sonawane

ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार गळाला लावले. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. आमदार वरूण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे स्वतः ठाकरेंमार्फत ओमराजे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. मात्र, ओमराजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाच. यानंतर उद्धव ठाकरे यांनी धारशिवमध्ये सभा घेत ओमराजे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अशातच उद्धव ठाकरे यांनी 2029 च्या निवडणुकीसाठी ओमराजे यांच्या विरोधात बड्या नेत्याला गळाला लावले आहे.

धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी मातोश्री येथे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी संजय निंबाळकर यांच्या मनगठावर शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केले.

निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित आहेत. तर रामेश्वर शेटे हे भाजपमध्ये होते. या दोघांच्या पक्षप्रवेशासाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित झालेल्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाने धाराशिवमध्ये 2029 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या नेत्यांनी हाती घेतली मशाल?

धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संजय निंबाळकर, भाजपचे रामेश्वर शेटे, रामभाऊ पडवळ, भीमराव साळुंखे, अतुल बागल, शिवशंकर शिंदे ह्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी धाराशिव जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सपर्कप्रमुख मकरंदराजे निंबाळकर आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena SC Live : वेळ निघून गेलाय, अध्यक्षांनी चुकीचे निकष लावले...'; सुप्रीम कोर्टात देवदत्त कामतांनी शिंदे गटाला कसं घेरलं?

Prajakta and Lalit: 13 वर्षांनी पुन्हा जुळणार 'रेशीमगाठ'; ललित आणि प्राजक्ता नव्या रुपात येणार एकत्र

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत रिक्षाचालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी; आरटीओची धडक कारवाई

BMC News : तरुणांना BMCमध्ये थेट कामाची संधी; १२ महिन्यांची Fellowship, अर्जाची प्रक्रिया काय?

Politics : २०२४ मध्ये माजी आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार होता; शिंदेसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT