Uddhav Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Uddahv Thackeray : अस्सल पैलवान निवडून येणारच; उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगलीचा उमेदवार जाहीर

Uddahv Thackeray Latest news : 'सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. अस्सल पैलवान निवडून येणारच, असा दावा करत उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केला आहे.

विजय पाटील

Uddahv Thackeray Latest News :

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या काही मतदारसंघावरून तिढा कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेआधीच उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केला आहे. 'सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. अस्सल पैलवान निवडून येणारच, असा दावा करत उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांच्या सांगलीतील भाषणातील ठळक मुद्दे

१. शिवसेना-राष्ट्रवादी फोडली, याचे उत्तर द्या. देवेंद्र फडणवीस यांचं बारसं कोणी केले माहीत नाही. ते म्हणतात मी पुन्हा येईल, पण दोन पक्ष फोडून आले.

२. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच दणका दिला आहे. पक्षांतर केलं, मतदारांची चेष्टा केली. न्यायालयाकडून न्यायाची भूमिका आहे. न्याय देवतेला हात जोडून विनंती आहे. लवकर निर्णय घ्यावा.

३. अजित पवारांची तात्पुरती निशाणी आहे. नार्वेकरांनी शिवसेना त्यांच्या हातात दिली. आम्ही हिंदूत्व सोडले नाही. हे लोक हिंदुत्ववादी नाहीत. भाजपचे हिंदूत्व घर पेटवणारे आहे.

४. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. त्यांना जिंकून द्या.

५. अबकी बार 400 पार... तुम्ही काय खुर्च्यांचे दुकान काढले आहे का?

६. आम्ही कधी तुमच्या कुटुंबावर बोलतो का, आमच्या शिवसेनेवर बोलता. जनाची नाही तर मनाची ठेवा. संकट काळात आम्ही तुम्हाला मदत केली. बाळासाहेब यांच्या पुढे लोटांगण घातला होता. ते संपवायला चालला आहात. लाज वाटत नाही.

७. मी एवढा कमकुवत नाही. राजकारणात जळून भस्म होणार. पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली म्हणता... पण अमित शहा यांच्यामुळे क्रिकेट हरलो. तुमच्या मुलाने फायनल गुजरातला का नेली?

८. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी लुटून देत नव्हते. पण आता महाराष्ट्र लुटत आहेत.

९. मोदी भक्त तुमचे प्रेम तुमच्या सोबत ठेवा. 400 पार नाटक आहे. राज्य घटना बदलण्यासाठी हे 400 पार होणार आहेत. तुम्हाला चालणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT