Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Alliance Money Control
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची दोस्ती होणार? मविआ सोडणार, ठाकरे महायुतीत जाणार?

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Alliance: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडालीय. फडवणीसांच्या विधानामुळे मविआतील काँग्रेस आणि शरद पवार गटाची चिंता वाढलीय.

Snehil Shivaji

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण एकमेंकाच्या विरोधात असणारे ठाकरे - फडणवीस आता पुन्हा एकमेंकांचा हात हातात घेण्याची शक्यता आहे.. फडणवीसांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेला ऊत आलाय. नेमकं हे विधान काय आहे आणि ठाकरे-फडणवीसांच्या महिन्याभरातल्या तीन भेटींमागचं काय गूढ आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ब्रम्हदेवापासून बाबा वेंगापर्यंत कोणीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे आता सांगू शकत नाही. एक तर तु राहशील किंवा मी. अशा शब्दात फडणवीसांना निर्वाणीचा इशारा देणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर मविआत नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी केलीय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आधी मित्र होते मात्र आता शत्रू नाही असं म्हणत पुन्हा मैत्रीचे संकेत दिले आहेत. तर राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिल्यामुळे ठाकरे-फडणवीस टाळी देणार का अशी चर्चा रंगू लागलीय.

केवळ या विधानामधून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जळतील असं नाही...तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंनी त्यांच्या भेटीची एकही संधी सोडलेली नाही.

भेटींनंतर दोस्ती, पुढचा प्रवास युती?

महिनाभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या तीन वेळा भेटी झाल्या.

नागपूर अधिवेशात 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली होती.

त्यानंतर २० डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली

९ जानेवारीला आदित्य ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली.

या भेटींमागे नेमकं काय दडलंय याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झालीय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे शांत आहेत. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता आहे की आणखी काही याचं उत्तर भविष्यात मिळेलचं. मात्र मविआतून बाहेर पडण्याच्या ठाकरेंच्या हालचाली आणि महिनाभरात तीन वेळा भेटी झाल्यामुळे शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास थेट युतीपर्यंत पोहचणार का? याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT