मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; शिवसेना आमदाराची कोरोना काळात जंगी मिरवणूक Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; शिवसेना आमदाराची कोरोना काळात जंगी मिरवणूक

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शहाजी पाटलांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सांगोल्यात ज्या नेत्यासाठी सभा घेतली त्या नेत्याने सांगोल्यात कोरोनाचे (Coronavirus) नियम मोडत मुख्यमंत्र्यांनीच घालून दिलेले नियम पायदळी तुडवले आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी कोरोनाच्या या संकटात गर्दी जमवून मिरवणूक काढली. यावरुन असे सिद्ध होते की मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शहाजी पाटलांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना तसेच सभा, समारंभांनी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच नेते भर पावसात मिरणूक काढून लोकांच्या जिवाशी खेळत असतील तर मग कोरोना आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. सांगोल्यातील खवासपूर गावात मिरवणूक काढण्यात आली. गेल्या महिन्यात सांगोल्यात कोरोनाचे रुग्ण वेगात वाढत होते. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा मिरवणूकांमुळे कोरोना वाढण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापूरात कोरोनाचा धोका कायम असताना विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्दी केली जात आहे. त्याचे उदाहरण म्हणजे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील काढण्यात आलेली मिरवणूक. या मिरवणुकीला गावकऱ्यांनी तसंच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT