uddhav thackeray raj thackeray x
महाराष्ट्र

Uddhav-Raj Thackeray: शिवसेना- मनसे एकत्र येणार? महापालिकेसाठी ठाकरे सेनेचा मविआला रामराम? वाचा स्पेशल रिपोर्ट

Uddhav-Raj Thackeray Union For Mahangarpalika Election: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सर्वत्र होत आहे. महापालिका निवडणूकीसाठी हे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचा फॉर्म्युला समोर आलाय..युतीमध्ये दोन्ही पक्ष किती जागा लढवणार? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून....

महापालिकेसाठी ठाकरे सेनेचा मविआला रामराम?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. मराठीच्या मुद्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची युती कधी होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांची भेट घेत असले तरी दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपावरून चर्चा झाली आहे. याचं चर्चेतून निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे...

ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महापालिकेसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठरलाय. मुंबई वगळता ठाणे, कल्याण- डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 60-40 चा फॉर्म्युला असेल. त्यात ठाकरेसेनेला 60 टक्के तर 40 टक्के जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंनी एकत्र निव़डणूक लढवल्यास मराठी बहुल मतदारसंघात निश्चितच त्यांना फायदा होईल.

माहिम, भांडुप, विक्रोळी, विलेपार्ले आणि शिवडी विधानसभा मतदारसंघात मराठी मते जास्त आहेत. या पाच विधानसभा मतदारसंघात दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापालिका क्षेत्रात आढावा बैठका घेतल्या जातायत. या आढावा बैठकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये स्वतंत्र बैठक होईल आणि मग कोणी किती जागा लढवणार, हे समोर येईल. दरम्यान दसरा मेळाव्यात किंवा दिवाळीच्या आसपास युतीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. युतीच्या घोषणेनंतरच जागा वाटपाचा अधिकृतरित्या फॉर्म्युलाही समोर येईल. दोन्ही पक्षांतील नेते आणि कार्यकर्तेही युतीसाठी उत्सुक आहेत. ठाणे, कल्याण, नाशिकमध्ये तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितरीत्या आंदोलनही करतायेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसमोर आव्हान उभ राहाणार आहे हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पवार काका-पुतणे एकत्र

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT