Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosale Saam TV
महाराष्ट्र

Satara : ...अन्यथा कडेलाेट पॉइंटवरून उडी मारा, घेताय चॅलेज ? शिवेंद्रराजेंना उदयनराजेंचं आव्हान (पाहा व्हिडिओ)

आज उदयनराजेंनी सातारा पालिका नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale News : साताऱ्याचे (satara) खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंटवरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना (shivendraraje bhosale) दिलं आहे.

सातारा पालिकेच्या वतीने पालिकेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या जिल्हा परिषदेच्या समाेर सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आज खासदार उदयनराजे भाेसले हे सकाळीच तेथे पाेहचले हाेते. तेथेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह त्यांच्या नगरविकास आघाडीवर हल्लाबाेल केला.

खासदार उदयनराजेंनी सातारा पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत हिम्मत असेल तर मी बोललेल्या गोष्टींना उत्तर द्या. फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंवर केली. यावेळी 50 च्या 50 नगरसेवक सातारा विकास आघाडीचे निवडून येतील असा विश्वास देखील उदयनराजेंनी व्यक्त केला आहे. माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे तुमचा सारखा मी आल्हाद आमदार झालेलो नसल्याची खोचक टीका देखील खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

Rohit Sharma: भर मैदानात रोहित शर्माने कोणती मागितली इच्छा? हिटमॅनचा जवळचा मित्र अभिषेक नायरने केला खुलासा

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT