Udayanraje Bhosale 
महाराष्ट्र

देव काेणी पाण्यात ठेवले माहित नाही; उदयनराजे तुमच्यासमाेर उभा आहे

ओंकार कदम

सातारा : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी कोरोना विषयी आज (बुधवार) पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केले आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याचे त्यांनी आज माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज सातारा पालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या साता-यातील विविध विकासकामांचे भुमीपूजन केले. त्यावेळी त्यांच्या समवेत पालिकेचे उपाध्यक्ष मनाेज शेंडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित हाेत्या. यावेळी उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नास बगल दिली.

दरम्यान काेराेनाबाबत coronavirus उदयनराजे म्हणाले आपल्याला कोराना होता का नाही हे माहित नाही. ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली.

कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहित नाही पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे असा मिश्किल टिप्पणी देखील उदयनराजेंनी यावेळी केली. दरम्यान मंगळवारी देखील उदयनराजेंनी काेराेना हा जन्माच्या आधी पासून आणि ताे राहणारच असे म्हटलं हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना कोणता ब्रश, ना कोणती टूथपेस्ट; फक्त हा एक उपाय करून पाहा, दात मोत्यासारखे चमकतील

Maharashtra News Live Update : जळगाव- सिन्नरकडून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची जोरदार धडक; 12 जखमी

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Smartphone Explode : पावसाळ्यात स्मार्टफोनचा कधीही होऊ शकतो स्फोट, चुकूनही करू नका 'ही' १ चूक

IBD symptoms: अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा आतड्यांना सूज आलीये!

SCROLL FOR NEXT