udayanraje bhosale 
महाराष्ट्र

DCC त राजे बिनविराेध; 'एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज'

'जे काही करायचे अथवा तुम्हाला स्थानिक पातळीवर जो निर्णय घ्यायचा तो जबाबदारीने घ्या. कुठेही गाफील राहू नका,' असे सूचक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत केले हाेते.

ओंकार कदम

सातारा : येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस हाेता. आज सकाळपासून जिल्ह्यातील नागरिकांना खासदार उदयनराजे भाेसले सत्ताधारी गट सामावून घेणार का याची उत्सुकता लागून राहिली हाेती. त्याचे चित्र दुपारी तीनच्या सुमारास स्पष्ट झाले. सत्ताधा-यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांना सर्वसमावेश पॅनलमध्ये सामावून घेतले. (Udayanraje Bhosale Shivendraraje Bhosale Satara DCC Bank election 2021)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 'सर्वसमावेशक पॅनल' मध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना घ्यावे की नकाे हा निर्णय स्थानिक पातळीवर ठरवून घ्या असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना सांगितले हाेते. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विचार जाणून घ्या असा सल्ला देखील पवार यांनी दिला हाेता.

त्यावेळी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर सर्व जबाबदारी साेपावात शरद पवार यांनी जे काही करायचे अथवा तुम्हाला स्थानिक पातळीवर जो निर्णय घ्यायचा तो जबाबदारीने घ्या. कुठेही गाफील राहू नका असे सूचक विधान केले हाेते. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ब-याच घडामाेडी झाल्या. या घडामाेडीत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी (प्रभाकर घार्गे) पक्षाचा आदेश धुडाकावत बॅंकेच्या संचालकपदसाठी अर्ज भरला. खासदार उदयनराजे भाेसले यांनी देखील जिल्ह्यातील फलटण आणि क-हाड येथे विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत दिवाळीच्या शुभेच्छा देत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली.

दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे मात्र आज (बुधवार) सकाळपर्यंत उदयनराजेंना सर्वसमावेश पॅनलमध्ये घेण्यास उत्सुक नव्हते. पुण्यातील बैठकीत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले नकाे अशी भुमिका मांडली हाेती. दरम्यान उदयनराजेंना सर्वसमावेशक असणाऱ्या पॅनेलमध्ये सामावून घेण्याची परवानगी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्याने उदयनराजेंचा मार्ग सुकर झाला. Dcc त राजे बिनविराेध झाल्यानंतर समर्थकांनी एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा घाेषणा देत फटाके फाेडले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp News : सलग दुसऱ्या दिवशी Whatsapp गंडलं, स्क्रोलिंग झालं बंद, युजर्स हैराण

मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?

Beetroot Paratha : मुलांना नकळत हेल्दी फूड खायला घालायचंय? मग बीटापासून बनलेला हा पिंक पराठा नक्की ट्राय करा

पुण्यात क्रीडा संकुलमध्ये डोपिंग सदृश इंजेक्शन आढळले; क्रीडा विश्वात खळबळ|VIDEO

Bajaj Pulsar 150 दहा हजारांनी स्वस्त होणार, नवीन किंमत किती?

SCROLL FOR NEXT