Udayanraje Bhosale  Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : डॉल्बीवरुन उदयनराजे भडकले, म्हणाले...

साता-यात माध्यमांशी बाेलताना खासदार उदयनराजे भाेसले यांनी डाॅल्बी व्यावसायिकांचा विचार करा असं म्हटलं.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे असं खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे आज स्पष्ट केले. उत्सव काळात डॉल्बी सिस्टीमला परवानगी नसल्याचे जिल्हा प्रशासनानं सांगितल्यानंतर आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी डॉल्बी का नको याचे कारण द्यावे असा जाब प्रशासनासह पाेलिसांना विचारला आहे.

सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश आलं. सातारा जिल्ह्यात सात वर्षापासून जिल्हा प्रशासनाने डॉल्बी वाजवण्यास बंदी घातली हाेती. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी डाॅल्बीला परवानगी दिली. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinhraje Bhosale) यांचे डॉल्बी व्यावसायिकांनी आणि मंडळाच्या अध्यक्षांनी आभार मानले.

दरम्यान आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी डाॅल्बीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले डाॅल्बी व्यावसायिकांच्या कुटुंबाचा प्रशासनानं विचार केला पाहिजे. त्यांनी माेठ्या प्रमाणात गुंतवणुक केली आहे. डाॅल्बीवर बंदी घातल्यानं त्यांना आर्थिक फटका बसत आहे. का का डाॅल्बीला परवानगी नाकारली जातेय असा खडा सवाल उदयनराजेंनी केला.

उदयनराजे म्हणाले केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनानं डाॅल्बीला परवानगी का नाही याचं पत्रक काढावं. प्रशासकीय अधिका-यांनी प्रत्येक घटकाचा विचार करुन निर्णय घेतले पाहिजेत. डाॅल्बी वाजलीच पाहिजे अशी माझी भुमिका आहे. दाेन तीन तासांनी काय आभाळ काेळसणार आहे का ? असा सवाल करीत उदयनराजे म्हणाले डाॅल्बी चालूच झाली पाहिजे या मताचा मी नाही सगळेच आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT