chhatrapati shivaji maharaj saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: गुलदस्त्यातील उदयनराजेंची घाेषणा वाचा सर्वांत प्रथम साम डिजीटलवर

आज खासदार उदयनराजे भाेसले यांचा वाढदिवस आहे.

Siddharth Latkar

सातारा : खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांचा वाढदिवस (udayanraje bhosale birthday) असून त्यांनी बुधवारी (ता.२३) जाहीर केल्यानूसार काही वेळापुर्वीच माेठ्या घाेषणेतील एक घाेषणा त्यांनी ट्विट करुन केली आहे. उदयनराजेंनी शिवछत्रपतींनी (chhatrapati shivaji maharaj) उभारलेला स्वराज्यलढा आधुनिक पद्धतीने शालेय मुलामुलींपर्यंत पोहोचवणारा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास त्यांनी मावळ्यांची शाळा असे नमूद केले आहे. (udayanraje bhosale breaking news in marathi)

उदयनराजे लिहितात ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत (india) देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नसून या ही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत. मात्र अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापर्यंत मर्यादित राहिला आहे. सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही.

त्यामुळे शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा हाच हेतू डाेळ्यासमाेर ठेऊन मावळ्यांची शाळा उपक्रम राबविणार आहाेत आहाेत. या उपक्रमामध्ये सातारा (satara) जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने शिवछत्रपतींनी (chhatrapati shivaji maharaj) उभारलेला स्वराज्यलढा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफ़िक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील.

शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीने पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावेत? ह्याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

हा उपक्रम अस्सल इतिहास प्रेरणादायी पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता पोहोचवता शहरातील अनेक हुशार तरूणांना रोजगार देखील देईल. तसेच एक अभिनव आणि आधुनिक शिक्षणपद्धती समोर आणेल की जिच्या यशाने या उपक्रमाला भविष्यात मोठ्या प्रमाणावर राबवणे सोपे जाईल असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT