Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : 'नुसत्या मिशा पिळून..., उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंना चिमटा

आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसलेंवर टीका केली.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale : केवळ मिशा पिळून काही हाेत नसतं. गाेष्टी साध्य हाेत नसतात. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. इकडं तिकडं फिरावं लागतं. मी नगरसेवकपासून माझी सुरुवात केली आहे. थेट आमदार झालेलाे नाही. त्यांनी इतक्या वर्षात काही केलं नाही आणि आम्ही करताेय तर आम्ही काही केलं नाही असे म्हणताहेत. नाही केलं आम्ही चला मान्य आहे. तुम्ही लाेकांसमाेर जाऊन काय बाेलणार असा सवाल उदयनराजेंनी (udayanraje bhosale) आमदार शिवेंद्रसिंहराजेंना केला.

आज खासदार उदयनराजे यांनी सातारा पालिका नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बंधू शिवेंद्रसिंहराजेंवर (shivendrasinhraje bhosale) टीका केली. उदयनराजे म्हणाले, ‘‘काहींनी आम्हाला मधल्या काळात मनोमिलन करून टाका, असे सांगितले. आम्ही ते मान्य करत मनोमिलन केले; पण पुढील पाच वर्षांत मनोमिलनाच्या काळात केवळ अडवाअडवी होऊ लागल्याने लोकांच्या हितासाठी मनोमिलन तोडले असं राजेंनी स्पष्ट केले.

उदयनराजे म्हणाले त्यानंतरच्या निवडणुकीत साताऱ्याच्या इतिहासात नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतिहासात लोकांनी त्यांच्याविरोधात कौल दिला. 40 पैकी एक अपक्ष, 38 जागा सातारा विकास आघाडीला आणि आमदारांच्या नगर विकास आघाडीचा एक नगरसेवक निवडून आला. आता यावेळेस आम्ही काम करणारे, लोकांसाठी झटणारे उमेदवार देणार आहोत. त्यामुळे सर्व 50 च्या 50 सातारा विकास आघाडीचे नगरसेवक साताऱ्याची जनता निवडून देईल असा विश्वास राजेंनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

SCROLL FOR NEXT