नाराज आमदारांच्या चर्चेवर उदय सामंत यांचे बावनकुळेंना उत्तर saam tv
महाराष्ट्र

नाराज आमदारांच्या चर्चेवर उदय सामंत यांचे बावनकुळेंना उत्तर

प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) यांनी केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : राज्य सरकारमध्ये फक्त राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसच्याच (Congress) आमदारांचीच कामं होत असून हे दोन्ही पक्ष आपापले पक्ष मजबूत करत आहेत. त्यामुळे शिवसेना (Shivsena) कमजोर होत आहे. प्रताप सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) यांनी केले होते. या विधानावर शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Uday Samant's reply to Bavankule on the discussion of disgruntled MLAs)

''नाराजी कुठल्या पक्षात आहे हे गेले दोन दिवस महाराष्ट्र बघतोय. दोन दिवसाची नाराजी कुणाची होती हे सर्वांना माहिती आहे. लोकांचं चित्त विचलित करण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे. शिवसेनेचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना विश्वास देण्यासाठी आमचे आमदार संपर्कात असल्याची वक्तव्ये केली जात आहेत. उद्धव ठाकरेंचे काम चांगले चालू असल्यामुळे भाजपची अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरदेखील आपली भूमिका व्यक्त केली आहे.

''प्रत्येकाने प्रत्येकाचा पक्ष वाढविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. काँग्रेस पक्षाचे निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी घेत असतात. महाराष्ट्राच्या स्तरावर काय बोलल जात यापेक्षा राष्ट्रीय स्तरावरचे नेते काय बोलतात याला महत्व आहे. असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या स्वबळाच्या विधानानंतर काल कॉंग्रेस नेत्यानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीवरदेखील उदय सामंत यांनी आपले मत मांडले आहे. ''तिन्ही पक्षाचे नेते हे फार दिग्गज आहेत. शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना का बोलावलं हे त्यांच्या मनातल मी ओळखू शकत नाही. त्या मोठ्या बैठकीबद्दल मी बोलण योग्य नाही, '' असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, एखाद्या नेत्याची चौकशी होत असताना मी काहीतरी मंत्री म्हणून बोलण चुकीचं ठरू शकत, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या झोटिंग समितीच्या अहवाला बाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT