Satara crime News  saam tv
महाराष्ट्र

Crime News: धक्कादायक! दोन तरुणांची एकाच खोलीत आत्महत्या; कोरेगावमधील खळबळजनक घटना

Satara News Update: या भयंकर घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे..

ओंकार कदम

Satara News: सातारा जिल्ह्यातील (Satara) कोरेगावमध्ये (Koregaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव शहरात एकाच खोलीत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली आहे. यामध्ये एकाने पेटवून घेतले तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या भयंकर घटनेने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या तरुणांनी आत्महत्या का केली असावी याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नाही. दोन तरुणांनी एकाचवेळी एकाच रुममध्ये आत्महत्या करणे संशयास्पद असल्याने याबाबत सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेचा कोरेगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT